वक्तृत्व एक वेड आहे.... ती एक ओढ आहे, कला आहे, साधना आहे... महाराष्ट्राला वक्त्यांची महान परंपरा आहे. या वक्त्यांची जडन-घडण ही महाराष्ट्रात होणा-या शेकडो वक्तृत्व स्पर्धांमध्ये दडलेली आहे. आजसुद्धा हजारो मुलं या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून महान वक्ता होण्याची स्वप्ने बघत असतात. अशा वक्तृत्ववेड्या विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना महाराष्ट्राच्या काना कोप-यात होणा-या विविध वक्तृत्व, काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धांची माहिती व्हावी हा माफक उद्देश...!!!